Home
मी एक पर्वत काळाच्या असीम लाटेवरती धरणीच्या पोटातून , तप्त उमाळ्यासरशी बाहेर आलेलो. मी नाही फक्त एक डोंगरांची रांग. माझ्या हजारो बाहुपाशांत वसलीय तुमची गावे, शहरे आणि वस्त्या. माझ्या रोमारोमांतून बाहेर पडणाऱ्या, निथळणाऱ्या, धावणाऱ्या पाण्यावर घातलेत तुम्ही बांध. आणि माझी विशाल छाती अडवतेय सिंधू सागरावरून लोटणारी मेघांची सेना. राम, लक्ष्मण, सीता यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली धरा आजही पावन स्थळांच्या रूपाने अजरामर झालीये. गौतमच्या कथा लेण्यांच्या रूपाने माझ्या हृदयावर कोरल्या गेल्यात. एक एक डोंगर नि दरीत शिवबाच्या मावळ्यांनी इतिहास घडविलाय. तुम्ही कोण आहात ? माझेच एक प्रतिरूप; हे त्याने ओळखले आणि प्रत्येक माणूस मावळा केला. एक एक मावळा एक एक सह्याद्री बनला. जेव्हा केव्हा तुम्ही माझ्या दऱ्या खोर्यात याल , आवाज द्याल तर तुम्हाला स्वताची ओळख पुन्हा सापडेल. आणि मग तुम्ही म्हणाल मी सह्याद्री.
Email: yogeshkardile@gmail.com
We value your opinion for constant upgradation.



